Copyright © 2025 दातार कुलमंडळ

ALL INDIA DATAR KUL SAMMELAN 2025

A Celebration of Heritage and Unity

Namaskar! 🙏

With immense pride and joy, we celebrated the 50-Year Celebration of the Datar Kul Vruttant — a golden milestone that reflects our enduring legacy, values, and togetherness.

Thank you all for making this a great event!

📅 Event Details

We know it was exciting — so thank you for coming!

We reconnected and celebrated with all:
DATARS / AGHARKARS / VARTAKS / SABNIS / KULKARNIS / CHAUKARS
…and many more from our extended family!

📆 Date: Sunday, 23rd November 2025

⏰ Time: 9:00 AM to 7:00 PM
(Spend the whole day with your extended family!)

📍 Venue: PYC Hindu Gymkhana, Pune

👗 Dress Code: Traditional Maharashtrian Attire or Smart Casuals 🌸

🎫 Highlights, Quotes and Recap

मराठी
दातार कुलसंमेलन भव्य स्वरूपात, Hitech वातावरणात प्रचंड यशस्वी झालं. यासाठी Captain of the Ship धनंजय दातार यांची vision , कार्यकारिणी सदस्यांनी त्यांना दिलेली साथ आणि कार्यकर्त्यांचे कष्ट या सर्वांना प्रचंड दाद देऊया. ❤️
    काही ठळक आणि वेगळ्या गोष्टी-
* कुलमंडळाच थीम साँग 
* ⁠टेक्नोलॉजीचा उपयोग: LED स्क्रीन, सोलर समई, Website, DIMS 
* ⁠शिस्त ( वेळेत संमेलन, चहा , नाश्ता, जेवण सुरू होणं.)
* ⁠ज्येष्ठांसाठी राखीव टेबल 
* ⁠आरक्षित बैठक व्यवस्था 
* ⁠भव्य स्वरूप 
* ⁠देवस्थानाच्या पुजाऱ्यांचा सत्कार 
* ⁠कुलवृत्तांत निर्मात्यांचं स्मरण 
* ⁠आपुलकी 
* ⁠ओळख सत्र. Meet n Greet 
* शेवटी मिळणारी Goodies bag 😀
* ⁠कलाकारांनी मोठ्या संख्येने येण. 
* ⁠ तरुणांचा सहभाग 
* ⁠सदस्यांचे फोटो display 
* ⁠दातार कुटुंबीयांचं कौतुक 
असे अनेक चांगले पैलू या संमेलनात होते.
    काही उणीवा असतीलही, मंडळाच्या लक्षात त्या आल्याही असतील. पण आपण सदस्यांनीही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायला हवं. यातूनच नवे विचार समोर येतील. 
     भेटत राहिलो तर ओळख वाढेल, आपलेपणाही वाढेल, याची खात्री देणारं हे संमेलन होतं.
‘एका बढता ही जावे चले चलो 
कोई हम से जीत ना पावे चले चलो.’
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
– डॉ स्मिता दातार
English

The Datar Kul Sammelan was grand, hi-tech, and immensely successful.
For this, let us wholeheartedly appreciate the Captain of the Ship, Dhananjay Datar, for his vision; the executive committee for their support; and the dedicated efforts of all volunteers. ❤️

Some notable and unique highlights:

  • The Kulmandal Theme Song

  • Use of Technology: LED screens, Solar Samai, Website, DIMS

  • Discipline (events, tea, snacks, lunch starting on time)

  • Reserved tables for seniors

  • Reserved seating arrangements

  • Grand scale of the event

  • Felicitation of the temple priests

  • Honouring of the creators of the Kulvruttant

  • Warmth and togetherness

  • Introduction session – Meet n’ Greet

  • Goodie bags at the end 😀

  • Large participation of artists

  • Active involvement of the youth

  • Display of member photographs

  • Appreciation for the Datar family

There were many such positive aspects in this gathering.

There may have been a few shortcomings, and the committee is surely aware of them. But even we, as members, must actively participate in every program. Only then will new ideas emerge.

This Sammelan assured us that when we keep meeting, our bond and sense of belonging will keep growing.

‘Let us continue moving forward,
No one can defeat us if we march on together.’

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
– Dr. Smita Datar

🎫 Highlights, Quotes and Recap

Prakash Phadnis

Dear Dhananjayji and Organizers, …
Many Thanks for Organizing Excellent Function 💐🙏🙏💐.
Regards,
Prakash Phadnis.


Rangnath Datar

Dhananjay sir program khup chan zala.sutrasanchalan pan apratim 🙏🙏💐💐
Nice to meet you also 🙏

Rangnath Datar


Dr jyoti godbole

धनंजय, दृष्ट लागेल असा कार्यक्रम केलास तू..सुंदर नियोजन, फार सुंदर..आता मात्र विश्रांती घे रे..रोहिणीची
आणि तुझी दृष्ट काढायला हवी.

Dr jyoti godbole


Minal NAIK

.Hello Mr Dhananjay

Ajacha programme khup chan hala . Full credit to you and your team for working relentlessly to
make the Datar Sammelan a resounding success 👏🏽👏🏽

Minal NAIK


Mr. Vivek Datar

आजचा कार्यक्रम “अतिशय उत्तम” झाला .
आणि यासाठी तु घेतलेली मेहनत सतत
जाणवत होती .

Mr. Vivek Datar


Dr Nikhil Datar

Hats off to you. I m totally zapped with tremendous organizational skills, detail to planning and
executional ease. Too good..

Dr Nikhil Datar


Mr Vilas Datar

आपल्या कुशल नेतृत्वाखाली आणि सर्व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमाने आजचे सुवर्णमहोत्सवी दातार
कुल संमेलन उत्कृष्टरीत्या यशस्वी झाले.आपले तसेच सर्व कार्यकारिणीचे मनापासून धन्यवाद 🙏🏼🙏🏼

Mr Vilas Datar


Mr .Amol Datar

जय श्रीराम.
आजचा दातार कुलमंडळाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम अतिशय सुगठीत रितीने सादर केला गेला याबद्दल
सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन. कार्यक्रम वेळेवर पारपाडणे हें आयोजकांच्या पुढील एक मोठे आव्हान
असते आणि ते तुम्ही यशस्वीरित्या पेलले याचे कौतुक केलेच पाहिजे
अध्यक्षीय भाषण समयोचित आणि मार्गदर्शनपर होते.
दातार कुलमंडळाला आधुनिक ज्ञानाची कवच कुंडले लेववलीत याचा सर्वाना फार आनंद झाला हे तर खरेच
पण त्याच बरोबर कौतुकही करावेसे वाटले.
कुलमंडळाच्या वाढदिवसानिमित्त सादर केलेले गीत लेखन, संगीत आणि सादरीकरण त्यासाठी उपलब्ध
असलेला वेळ बघता फार उच्च दर्जाचे होते हें नमूद करणे आवश्यक आहे. ब्राह्मण या संकल्पनेवरील गीत
खूपच प्रेरणादायक होते. आवश्यक
आसलेल्या गोष्टी आणि त्यांच्या समोरील आव्हाने आणि त्याचबरोबर काय करणे गरजेचे आहे याचे उत्कृष्ट
दर्शन त्यातून झाले.
अश्या सुंदर कार्यक्रमाचा भाग मला होता आले ते आपण आवर्जून निमंत्रण पाठवलेत यामुळे. आपल्याला
वैयक्तिक आणि आपल्या संपूर्ण संचाला सुद्धा यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण केलेल्या सत्कारामुळे
भारावून गेलो आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
आजसाठी खूप खूप शुभेच्छा.

Mr .Amol Datar


Mr . Aditya vivek Datar

Dear Kaka,
आजचा कार्यक्रम खूप म्हणजे खूपच छान झाला!
मस्त नियोजन! तुझी या सर्व मागे असलेली मेहनत प्रकर्षाने जाणवत होती!
Blessed to have a person like you!

Mr . Aditya vivek Datar
Thank you kaka.. 🙏😊
Yes offcourse i truly enjoyed the function. Good to know other Datar’s and their work .

Very well organised. Your efforts are appreciated . 👏👏
Will be in touch. 😊


Mrs.Deepika jog Datar

Mrs.Deepika jog Datar

Big big big thank you to you kaka. Love you a lot. I liked the way you lead this. Appreciate and
admire that I will also acquired this skills from you

Mr. Deepak. Datar


Commodore Harshad Datar

Today’s sammelan was well crafted and well executed. The variety among various events was
good and that kept the interest of the participants alive.

Good planning and collective execution by all of us in the Volunteer group made this possible.

And Dhananjay ji was at the helm of the whole program.

Many congratulations to all of us and thanks to Dhananjay ji for providing the leadership.

Commodore Harshad Datar


Salil M.Datar, Nashik

Dear Sir

We are thankful of all the efforts you have taken…to make this event a big success.

Lets stay in touch!!!
Salil M.Datar
Nashik


Mr. Nikhil datar ( founder )

Just Great.. All things done well and thoughtfully.
We started all of these again in 2016 to see this picture.. Dhananjayji, Harshadji, Mandarji,
Shriramji, Minalji and all the team..🙏🏼👌🏼

Mr. Nikhil datar ( founder )


Mr . Shrikant Datar

जय श्रीराम.
आजचा दातार कुलमंडळाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम अतिशय सुगठीत रितीने सादर केला गेला याबद्दल
सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन. कार्यक्रम वेळेवर पारपाडणे हें आयोजकांच्या पुढील एक मोठे आव्हान
असते आणि ते तुम्ही यशस्वीरित्या पेलले याचे कौतुक केलेच पाहिजे
अध्यक्षीय भाषण समयोचित आणि मार्गदर्शनपर होते.
दातार कुलमंडळाला आधुनिक ज्ञानाची कवच कुंडले लेववलीत याचा सर्वाना फार आनंद झाला हे तर खरेच
पण त्याच बरोबर कौतुकही करावेसे वाटले.
कुलमंडळाच्या वाढदिवसानिमित्त सादर केलेले गीत लेखन, संगीत आणि सादरीकरण त्यासाठी उपलब्ध
असलेला वेळ बघता फार उच्च दर्जाचे होते हें नमूद करणे आवश्यक आहे. ब्राह्मण या संकल्पनेवरील गीत
खूपच प्रेरणादायक होते. आवश्यक
आसलेल्या गोष्टी आणि त्यांच्या समोरील आव्हाने आणि त्याचबरोबर काय करणे गरजेचे आहे याचे उत्कृष्ट
दर्शन त्यातून झाले.
अश्या सुंदर कार्यक्रमाचा भाग मला होता आले ते आपण आवर्जून निमंत्रण पाठवलेत यामुळे. आपल्याला
वैयक्तिक आणि आपल्या संपूर्ण संचाला सुद्धा यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण केलेल्या सत्कारामुळे
भारावून गेलो आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
आजसाठी खूप खूप शुभेच्छा.

Mr . Shrikant Datar


Mrs Minal Dixit

आजचा कार्यक्रम अटेंड करून फार आनंद झाला एक मोठं कुटुंब आपल्याला मिळालं आहे अस वाटलं. श्री
धनंजय दातार काका यांनी खूप मेहनत घेतली असेल एवढे लोक एकत्र आणायला आणि म्हणून आज
वेगवेगळ्या लोकांच्या गाठीभेटी झाल्या त्याबद्दल काकांना विशेष धन्यवाद..🙏🏻

कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संयोजन सारेच कौतुकास्पद …सर्व टीम चे कौतुक आणि आभार …🙏🏻

Mrs Minal Dixit


Dr Vidydhar Datar

Thank you very much Datar GTG Org team🙏, Venue ,menu, program very well organised, all
of you took lot of efforts, thanks once again 🙏

Dr Vidydhar Datar


Dr Shriniwas Datar

नेटके आयोजन व नियोजन
देखणा कार्यक्रम👌
धनंजयकाका आणि सर्व सहकारी
मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार 💐💐💐

Dr Shriniwas Datar


Smt .Lata datar

अगदी बरोबर वर्णन केले आहे. खरंच, कार्यक्रम दैदीप्यमान असा झाला. त्याचा आपण एक भाग होतो
याहून भाग्य ते कोणते ?

अध्यक्ष, धनंजय दातार, मिनल, स्नेहा आगरकर आणि इतर सर्व तळमळीच्या कार्यकर्त्यांचे आभार ! हे
संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट पदोपदी जाणवत होते.

Smt .Lata datar


Arun Datar rekha datar ( warje ) pune

सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच या कार्यक्रमासाठी मदतीला आलेले सर्व कार्यकर्ते,सर्व अँकर्स, DIMS che
software design etc. सर्वांचे खूप खूप आभार.
तुम्ही सर्वांनी गेले काही महिने खूप मेहनत घेतली.
तुम्हा सर्वांचे धन्यवाद!
अरुण व रेखा दातार.

Arun Datar rekha datar ( warje ) pune


Mr. Abhijit Datar

कार्यक्रमाचे आयोजन नियोजन संयोजन सारेच कौतुकास्पद … धनंजय काका आणि सर्व टीम चे कौतुक
आणि आभार …🙏🏻🌹🎉

Mr. Abhijit Datar


Mr. Yateen Datar. Singapore

Thanks to the organising team & specially Dhananjay for excellent organisation of Datar Kul
Sammelan
I am sure members will benefit in some way with the connect provided.
Please do contact me for anything you need in Singapore & visit our Restaurant Sayalee soon.
Mr. Yateen Datar. Singapore


Mr. Parag sharad Datar

Khup sunder niyojan. Dhananjayji Datar and sarv team che manapasun khup khup dhanyvad.
Datar kulasmbelan, one of the Grand celebration. Great team effort. Keep it up All
Datars👍👍👍

Mr. Parag sharad Datar


Mrs. Vaidehi Datar

🙏 सगळा कार्यक्रम खुप छान झाला. जेवणाचा menu पण छान होता…. मज्जा आली….👍🙌😅👌🤝

Mrs. Vaidehi Datar


Ketan and Vijnani – Gandhkosh Hand Made Soaps

नमस्कार सर्वांना

आज आम्ही प्रथमच आपल्या कुल संमेलन चा भाग झालो आणि खूप आनंद झाला आपल्या सगळ्यांना
भेटून.
संमेलनासाठी ज्या सर्वानी अथक परिश्रम आणि मेहनत घेतले त्यासर्व मंडळींचे आभार, आज अतिशय
उत्साहात आपला सोहळा संपन्न झाला तो यासर्वाच्या अचूक नियोजन केल्यामुळेच.

विशेष आभार धनंजय काकांचे आमच्या फोन वरच्या बोलण्यातून त्यांना “गंधकोष” चा स्टॉल लावण्याची
इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ती लगेच मान्य केली आणि वेळोवेळी स्वतः फोन करून आमच्या तयारी
बद्दल अपडेट घेतले.

आणि विशेष आभार मीनल ताई यांचे , सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन आणि अप्रतिम सुत्रसंचालन, यामुळे
कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.

आपलेच

केतन आणि विज्ञानि
गंधकोष हँड मेड सोप्स


Dr Arun Datar

धनंजयराव मनःपूर्वक धन्यवाद. आम्ही थोडा वेळ संमेलनात हजार होतो. तुमच्या गेल्या अनेक महिन्याच्या
कष्टाचे चिज झाले . तुम्ही रात्रंदिवस लोकांची माहिती मिळवली त्यांना दातार कुलमंडळाच्या संमेलनाला
येण्याचे आवाहन केले आणि त्याच चिज झाल हे आज दिसलं. ३००-३५० सभासद आज उपस्थित होते.
परत एकदा धन्यवाद.

Dr Arun Datar


Mr. Anil Datar ( IT )

Dhananjay ji, and organizing team , excellent job 👏👏. खूपच उत्कृष्ट कार्यक्रम झाला. तुम्ही
सर्वांनी खूप मेहनत करून सुंदर आयोजन केले होते. सर्व दातारांना भेटून खूप आनंद झाला. पुन्हा एकदा
धन्यवाद आणि अभिनंदन🙏

Mr. Anil Datar ( IT )


Mr. Anil Datar (. drdo )

Thanks to everyone organising today’s Kul Sammelan. Everything managed in an excellent way.
Feelings of togetherness, curiosity to know each other and free conversations….great job done.
Special thanks to Dhananjay.

Mr. Anil Datar (. drdo )


Dr Chaitanya Datar

Dear Dhananjay ji and team.. the program was very well organized. The compering, food and
audiovisuals were excellent. Got to meet like minded people and all of us enjoyed.. Thank you
for everything.. 🙏🏻🙏🏻

Dr Chaitanya Datar


Mrs .Devaki. Kunte Datar – Indian Language Bureau

Kudos to Dhananjay kaka and the entire organising team for an excellent and engaging program

Mrs .Devaki. Kunte Datar
Indian language bureau


Mr. Deepali mukund Datar

Dhananjayji It was really a wonderful day. Very well organised event and got an opportunity to
meet and connect many creative and talented Datars, Agarakars, Vartaks and Kulkarni’s. Enjoyed
today’s meet a lot. Many thanks 🙏🏻.

Mr. Deepali mukund Datar


Dr Nikhil Datar (2nd message)

Today’s function has really raised the bar to high level. The function was gorgeous. Smallest
detail was worked out. Efforts of entire committee were visible. I can’t thank enough…
Dhananjay Datar Sir. He genuinely deserved a standing ovation.. dr nikhil datar

Dr Nikhil Datar


Mr. Amod arvind datar … australia

Hats off to the organising team for a huge effort and flawless execution. I am so happy to have
attended. I will cherish the memories and I am blessed to have made so many new connections!!

Mr. Amod arvind datar … australia


Madhura, Vaijayanti & Makarand Datar

श्री धनंजत दातार, पुणे
संयोजक, दातार कुलमंडल संमेलन
23 नोव्हेंबर 2025 यांस,
नमस्कार.
मधुराला व तिच्यासह आम्हाला दातार कुलमंडलाच्या अतिशय सुंदर संमेलनात सहभागी करून घेतलेत
त्याबद्दल तुमचे व सर्व दातार कुलाचे मनापासून आभार. मधुराचा ज्या आपुलकीने तुम्ही व सर्व संयोजकांनी
सन्मान केलात त्याबद्दल आभार मानावे तेवढे कमीच.
या संमेलनामुळे दातार कुलातले खूप सारे कर्तुत्ववान सभासद एकत्र दिसण्याचा व भेटण्याचा दुर्मिळ योग
आम्हाला प्राप्त झाला. आपल्या कुलात कित्येक कर्तुत्ववान आणि ‘पाय जमिनीवरच’ असणारे खूप जण
आहेत याची जाण आली.
संमेलन घडवून आणण्यासाठी तुम्ही घेतलेल्या अथक कष्टांतून सुंदर सोहळा तुम्ही संपन्न केलात त्याबद्दल
लाख लाख आभार व धन्यवाद !!!!
आम्हाला अशा संमेलनात सहभागी होणे कायमच आनंदाचे आहे व असेल.
मधुरा, वैजयंती व मकरंद दातार.


Mrs .Chitra phadnis

My deepest gratitude to all the committee members for giving us such a wonderful day on 23rd
november.🙏looking forward to the next function .

Mrs .Chitra phadnis


Mr. Kiran Datar

नमस्कार, दातार कुलमंडळ संमेलन चा कार्यक्रम खूपच सुंदर झाला सर्व टीम चे उत्तम नियोजन होते
तसेच उत्तम सूत्रसंचालन व धनंजय सर (अध्यक्ष )यांचे उत्तम मार्ग दर्शन,तसेच सेलिब्रेटीची उपस्थिती छान
होती व सर्व दातार बंधुची उपस्थिती ह्या वेळेस लक्षनीय होती एकंदरीस कार्यक्रम उत्तम पार पडला , नंतर
चे प्रकाशन पण छान झाले

Mr. Kiran Datar


Mr. Mahesh vartak

सुंदर अधिवेशन कार्यक्रम झाला. दातार कुलमंडळ एका नवीन उंचीवर गेलं. सगळ्यांचे अभिनंदन 🙏😀

डॉ. स्मिता दातार यांचा ‘ एक होती हिडिंबा ‘ या पुस्तक प्रकाशन सोहळा खूप छान झाला.
डॉ. स्मिता आणि डॉ. निखिल यांचे अभिनंदन 🙏😊

Mr. Mahesh vartak


Mrs. Himani Narvane

Thanks to the organizing team for a very enjoyable morning. It was wonderful meeting so many
interesting people. Excellent arrangements. Very well coordinated event.

Mrs. Himani Narvane


Mr. Bharat Datar

Many thanks to Dhananjay and organizers, for today’s event!! It was memorable indeed!!
👍👍🙏

Mr. Bharat Datar


Mrs . Rashmi Datar

Dhananjay sir program khup chan zala.sutrasanchalan pan apratim 🙏🙏💐💐

Mrs . Rashmi Datar


Mr. Ulhas Datar

Dhananjay ji,
Great effort! All team members of old and new committee members and volunteers worked
tirelessly to create yesterday’s kulsammelan a great success. This sammelan was definitely
different and grand. The time given to interact with each other was very useful. Kudos to you
and all organizers

Mr. Ulhas Datar


Mrs .Manjusha kanitkar

धनंजय काका कालचा दातार कुल संमेलनाचा कार्यक्रम खूपच छान‌ झाला. मला आणि माझ्या बहिणीला
खूप छान वाटले. तुम्हा सर्वांनी छान आयोजन केले होते. जेवण पण टेस्टी होते. तुम्हाला सर्वांना धन्यवाद
🙏

Mrs .Manjusha kanitkar


Mrs Minal Manish Datar, Thane

नमस्कार मंडळी, काल pyc येथे संपन्न झालेले आपले दातार कुळाचे पाचवे कुलसंमेलन.
२०१८ येथे प्रतिज्ञा हॉल पुणे येथे पहिले संमेलन झाले होते. अस म्हणतात की तिळा तिळा ने वृद्धी व्हावी की
ती अक्षय्य टिकते. दातार कुलमंडळाची ही अशीच वृद्धी तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी
होत आहे. कालचे संमेलन हा त्याचाच एक अनुभव. यामध्ये तरुणांची वाढणारी संख्या ही आणखीन एक
लक्षणीय बाब. कुलमंडळ स्थापनेपासून आम्ही संस्थापक मंडळींनी बघितलेलं स्वप्न
नक्की साकार होईल याची काल खात्री पटली. कुलमंडळ अध्यक्ष धनंजय दातार यांची मेहनत,
व्यवस्थापन आणि सगळ्या स्वयंसेवकांनी जीव ओतून केलेले काम याचे फलित म्हणजे कालचे संमेलन….
प्रत्येक कार्यक्रम करताना निवेदक म्हणून आम्ही आमचा लेखाजोगाही मांडत असतो. निवेदक,
सूत्रसंचालक म्हणजे रसिक आणि मंच यांच्यामधला दुवा… कार्यक्रम सुरू करण्यापासून ते आभार प्रदर्शन
होईपर्यंत ती जबाबदारी सूत्रसंचालकाकडे असते. स्वतः कमी शब्दात बोलून मंचाला बोलतं करण महत्वाचं
असतं. कालचा कार्यक्रम करताना सूत्रसंचालक म्हणून मला अतिशय आनंद झाला. समाधान वाटले पण
दोन गोष्टींची खंत ही वाटली.. आणि ती इथे नमूद करणं आवश्यक आहे. कौतुक सगळेच करतात . आणि
करायलाच हवे. परंतु दातार म्हणून आपणही काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्यक वाटते.
आपली संमेलनाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० अशी नमूद केली होती. पण बरेच जण लवकर
जाताना दिसले ( प्रत्येकाची कारणं वेगळी आणि genuine असू शकतात. पण तरीही एक दिवस आपण
नक्की काढू शकतो. याचा विचार अवश्य व्हावा.). कलाकार कट्टा नंतर आपल्यातलेच
हौशी गायक कराओके वर गाणी म्हणणार होते. त्याचं कौतुक करायला आपण थांबणं आवश्यक होत. आणि
जे थांबले होते त्यांनी निव्वळ कलाकारांबरोबर फोटो न काढता कार्यक्रम बघणं आवश्यक होत. कारण ज्या
कलाकारांनी गाण्यासाठी नाव दिली होती त्यांचा हिरमोड झाला नसेल का याचा विचार करावा. हीच गोष्ट
आपल्या स्वतः च्याच बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत घडली असती तर? समोर प्रेक्षक नसल्याने उरलेल्या
इन मीन दोन कलाकारांनीही माघार घेतली. कार्यक्रमाची सूत्रसंचालक आणि नियोजनातील एक
भाग म्हणून मी त्या दोघांची ( विलास दातार, हर्षदा दातार) माफी मागते🙏🏼 सगळे आपलेच
आहेत त्यामुळे कौतुकबरोबरच जे वाटल आणि खर आहे ते बोलले यासाठी क्षमस्व🙏🏼
लोभ आहेच तो वृद्धींगत व्हावा.

मीनल मनीष दातार. ठाणे


Mrs Kavita datar

सुप्रभात
धनंजय सर, हर्षद दादा, कुलकर्णी काका यांचे मार्गदर्शन, स्वयंसेवकांचे अथक परिश्रम, मान्यवरांची
उपस्थिती, उपस्थितांशी झालेला परिचय आणि संवाद या सगळ्यामुळे कालचा दातार कुलसंमेलन सोहळा
खूप छान पार पडला. व्यासपीठावरील सोलर समई आणि भगवान परशुरामांची मूर्ती विशेष लक्ष वेधून घेत
होती. धन्यवाद धनंजय सर, कार्यकारिणी सदस्य आणि सर्व volunteers
🙏🏻

Mrs Kavita datar


Smt .Lata Datar (2nd message)

खरंच ! सुरेख नियोजन होते. सगळ्या विविध क्षेत्रातील दातारांना एकत्र आणण्याची खरी कसोटी होती आणि
ती तुम्ही सहकार्यांच्या मदतीने तुमच्या खांद्यावर छान पेललीत. आम्ही सर्व दातार भाग्यवान आहोत की
तुमच्यासारखा एक सच्चा अध्यक्ष आम्हाला मिळाला… त्रिवार धन्यवाद !!

Smt .Lata Datar


Prashant Kulkarni

🌸 दातार कुलमंडळास मनःपूर्वक आभार 🌸
प्रिय दातार कुलमंडळातील सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते,
आपल्या मनापासून दिलेल्या आमंत्रणासाठी तसेच इतक्या सुंदर, भव्य आणि शिस्तबद्ध सुवर्ण
संमेलनाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी
हार्दिक धन्यवाद…
कार्यक्रमातील प्रत्येक क्षण—स्वागत, सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, माहितीचे सत्र, उपस्थितांची प्रेमळ
भेट—सगळेच अतिशय मनाला उभारी देणारे होते.
आपल्या टीमची एकजूट, मेहनत, नियोजन आणि अतिथीसेवेची परंपरा अनुभवताना खूपच अभिमान
वाटला.
वेळ अभावी संपूर्ण कार्येक्रमास थांबता नाही आले, त्याबद्दल क्षमस्व.
परंतु दातार परिवाराच्या या सुवर्ण पर्वाचा भाग होण्याचा आनंद आणि समाधान शब्दात मावणार नाही.
मनापासून आभार… आणि पुढील सर्व उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
आपला,
प्रशांत कुलकर्णी,
उपाध्यक्ष,
भाजपा, संस्कृतिक प्रकोष्ठ,
पुणे शहर.


Mr. Manish Datar

कालचा कार्यक्रम तर चांगला झालाच पण त्यात संमेलना चे प्रमुख पाहुणे श्री अरविंद दातार आणी श्री शैलेश
दातार यांनी खूप सूचक विधाने केली कि हे केवळ एक स्नेहसंमेलन न होता आणखी वेगळे काहीतरी हवे.
आपले सर्वांचे लाडके विद्यमान अध्यक्ष श्री धनंजय हे सुद्धा खूप वेळा दातारांनी दाता व्हावे म्हणून आवाहन
करत असतात.
तर या सर्व अनुषंगाने मला असे एक सुचवावे वाटते कि कुलमंडळाने एक मोठा फंड जमा करावा आणी
त्याचा विनियोग गरजू दातार कुटुंबीय यांना बिनव्याजी पण भविष्यात परत करायच्या बोलीवर करावा.
आज अचानक आलेले वैद्यकीय गरज किंवा मुलांचे उच्च शिक्षण पुरेश्या निधीअभावी राहून जाते.
या फंड मध्ये प्रत्येक सभासद यथाशक्ती दान देऊ शकेल.

मी स्वतः काही रक्कम माझ्या सहरूदांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी द्यायला तयार आहे.

या वर नक्की विचार व्हावा अशी विनंती. 🙏
@⁨Dhananjay⁩

Mr. Manish Datar


Mrs . Manjiri Datar

Get Oकालचा कार्यक्रम खूप छान झाला….धनंजय काका आणि सगळ्याच कार्यकारी मंडळींचे खूप
आभार.
इतका नेटका सोहळा पार पाडलात…..🌹🙏🏻

Mrs . Manjiri Datar


Mrs Poonam karve

Gm
कालचा दातार कुल संमेलना चा कार्यक्रम खुपच छान झाला. 👍
Perfect management..arrangement..
Kudos to you & your team 👍
& thanks for calling me 🙏

Mrs Poonam karve


Mr. Mukund Datar (1st message)

Dhananjay sir

Thank you so much for your kind words and the warm welcome. Being part of the DATAR
family was a truly memorable experience for me. I enjoyed every moment of the
interaction—especially the opportunity to connect with so many wonderful people and share
ideas. It felt like being among friends, and that sense of belonging means a lot to me. I look
forward to staying connected and contributing to our efforts to communicate and grow together.
Your efforts are truly fabulous. You are very charismatic & inspirational personality.
Thank you verymuch for everything 🙏🏻
Mr. Mukund Datar


Smt Anupama Paranjpe (Daya Vasant Datar)

मी सौ.अनुपमा परांजपे.
दातारांची माहेरवाशीण.पूर्वीची दया वसंत दातार.
कालचा कुलसंमेलन कार्यक्रम खूप छान झाला.
सर्वच कार्यक्रम दर्जेदार झाले.नियोजन उत्तम होते.


Dr. Smita Datar

दातार कुलसंमेलन भव्य स्वरूपात, Hitech वातावरणात प्रचंड यशस्वी झालं. यासाठी Captain of the Ship
धनंजय दातार यांची vision , कार्यकारिणी सदस्यांनी त्यांना दिलेली साथ आणि कार्यकर्त्यांचे कष्ट या सर्वांना
प्रचंड दाद देऊया. ❤️
काही ठळक आणि वेगळ्या गोष्टी-

  • कुलमंडळाच थीम साँग

  • ⁠टेक्नोलॉजीचा उपयोग: LED स्क्रीन, सोलर समई, Website, DIMS

  • ⁠शिस्त ( वेळेत संमेलन, चहा , नाश्ता, जेवण सुरू होणं.)

  • ⁠ज्येष्ठांसाठी राखीव टेबल

  • ⁠आरक्षित बैठक व्यवस्था

  • ⁠भव्य स्वरूप

  • ⁠देवस्थानाच्या पुजाऱ्यांचा सत्कार

  • ⁠कुलवृत्तांत निर्मात्यांचं स्मरण

  • ⁠आपुलकी

  • ⁠ओळख सत्र. Meet n Greet

  • शेवटी मिळणारी Goodies bag 😀

  • ⁠कलाकारांनी मोठ्या संख्येने येण.

  • ⁠ तरुणांचा सहभाग

  • ⁠सदस्यांचे फोटो display

  • ⁠दातार कुटुंबीयांचं कौतुक
    असे अनेक चांगले पैलू या संमेलनात होते.
    काही उणीवा असतीलही, मंडळाच्या लक्षात त्या आल्याही असतील. पण आपण सदस्यांनीही प्रत्येक
    कार्यक्रमात सहभागी व्हायला हवं. यातूनच नवे विचार समोर येतील.
    भेटत राहिलो तर ओळख वाढेल, आपलेपणाही वाढेल, याची खात्री देणारं हे संमेलन होतं.
    ‘एका बढता ही जावे चले चलो
    कोई हम से जीत ना पावे चले चलो.’
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • डॉ स्मिता दातार


Mrs.Prajkta Datar

Extremely Grateful for this event.
It was nice meeting you all.
We all are FAMILY now❤️🙏🏻✨😇🙌🏻
@⁨Dhananjay⁩ & team Thank you so much for this initiative.🙏🏻👍🏻

Mrs.Prajkta Datar


Mr. Shailesh Agharkar

🙏🏻 thanks for support me, accept my creative, suggest me, approached me and many more,
thank you 🙏🏻

Mr. Shailesh Agharkar


Mr. Abhijit from Kalyan

काका, तुम्ही आपलं कुटुंब या नात्याने एक यशस्वी आणि अफलातून संमेलन आयोजित केलं. तुम्ही
वैयक्तिक (कॉलिंग माध्यमातून)सगळ्यांपर्यंत पोहोचुन सगळ्यांना प्रेरीत करत होतात ,आहात.
We All DATAR proud of you and your entire team

We All are one and a whole family

DATAR FOR DATAR

Mr. Abhijit from Kalyan


Mr. Parag sharad datar (2nd message)

Sir, no need to express this as we are all are Family. Gift is not at all important than what efforts
you all have taken. What we earn is most important than what gifts we are carrying.🙏🙏🙏

Mr. Parag sharad datar


Mr. Milind Datar … nashik

तुमच्या आणि टीम च्या अफाट मेहनतीस सलाम. 🫡🫡🫡

Mr. Milind Datar … nashik


Smt Lata datar (3rd message)

सर, असल्या क्षुल्लक कारणांनी एवढ्या मोठ्या कष्टाने आयोजित केलेल्या event ला अजिबात गालबोट
लागणार नाही. एक संमेलन आयोजित करायचे म्हणजे तुमच्या टिमसारख्या माणसांची जिगरच कामी येते.
आम्ही खूप समाधानी आहोत…
एवढ्या मोठ्या प्रमाणात दातार्स एकत्र येणे हेच आमच्यासाठी अनोखे होते. त्याबद्दल सगळ्या टिमचे कौतुक
आणि धन्यवाद !
👍👍👍👍👍👍👍👍

Smt Lata datar


Mrs.Sneha agharkar

मित्रहो… नमस्कार..🙏☺️ काल दातार कुल संमेलन…त्यातील अनेक उप कार्यक्रम आणि अनेकांचा
सहभाग यामुळे खूप छान झाले… धनंजय दातार यांनी आणि त्यांच्या टीम नी केलेली सगळी व्यवस्था उत्तम
होती…अनेक क्षेत्रात उत्तम नाव मिळालेली दिग्गज दातार मंडळी भेटली….त्यांना ऐकता आलं…एकूणच
दिवस खूप आनंदात गेला…पुनश्च भेटूच…धन्यवाद…..

Mrs.Sneha agharkar


Mrs Manjiri Datar (2nd message)

नमस्कार मंडळी
काल आपण आपल्या संमेलनात दोन स्पर्धा घेतल्या होत्या….
एक उखाण्याची स्पर्धा जी आपण आधीपासून जाहिर केली होती…..
त्याचे स्नेहा आघारकर आणि अदिती आघारकर या दोघींनी परिक्षण केलं…त्यांचे खूप धन्यवाद….
दुसरी स्पर्धा ही आलेल्या सगळ्या सदस्यांसाठी होती…..त्याचे परिक्षक होते सई दातार आणि अक्षय दातार.
त्यांचेही खूप धन्यवाद .
दोन्हीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत. यात पहिला दुसरा असा काही नंबर नव्हता….दोन नंबर फक्त
काढले होते….
उखाणा स्पर्धा….
१) नेहा दातार
२) डॉ. सौ. आरती दातार

वेशभूषा स्पर्धा…
१) आशा गचके
२) श्रीराम दातार

विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन 🌹🙏🏻

Mrs Manjiri Datar


Mr. Prashant Kulkarni

Dear Dhananjay sir,
Thank you so much for your heartfelt message.

The Sammelan was a success because of your leadership, coordination, and the genuine warmth
with which you brought everyone together. I deeply value your hard work and the spirit with
which you are strengthening Kul Mandal.

Please accept my personal regards and gratitude.
Looking forward to supporting you in every possible way as we continue this journey together.
Mr. Prashant Kulkarni


Aapsinghe Guruji ( Tuljabhavani )

नमस्कार दातार कुलमंडळातफे॔ श्री.तुळजाभवानीदेवीचा उपाध्ये पुजारी म्हणून केलेला सन्मानाने आम्ही
भारावून गेलो, प्रत्यक्ष श्री.सरस्वती, श्री.लक्ष्मी चा वरदहस्त लाभलेले दातार मंडळीची उत्तरोत्तर सर्व क्षेत्रात
प्रगती होवो,उत्तम आरोग्य लाभो,हिच श्री.तुळजाभवानीदेवी चरणी प्रार्थना. जय परशुराम
Aapsinghe Guruji ( Tuljabhavani )


Dr nikhil (short repeat)

Hats off to you. I m totally zapped with tremendous organizational skills, detail to planning and
executional ease. Too good..

Dr nikhil


Mr. Salil Datar and Mrs Priyanka Datar

नमस्कार धनंजय काका 🙏🏻

रविवारी आयोजित केलेल्या दातार कूलमंडळच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या योग प्रियांका आणि
मला आला. सगळ्या दातार मंडळींना भेटून खूप आनंद झाला. तसेच विविध क्षेत्रात काम करणारे दातारही
भेटले. आज तुमच्या सहयोगाने आम्हाला आधार आश्रमाविषयीचे काम सगळ्यांसमोर मांडता आले. तसेच
तुमच्या मदतीमुळे आश्रमाला काही donations नजीकच्या काळात मिळतीलच अशी खात्री आहे 🙏🏻

तुम्ही अत्यंत सुंदर आणि सुबक पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण व्यवस्थापन, पाहुण्यांचे स्वागत,
आणि प्रत्येक छोट्या तपशीलावर घेतलेली मेहनत लक्षात येत होती.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या मागील कार्यक्रमापेक्षा लक्षणीयरीत्या वाढली होती, आणि
ही वाढ तुमच्या परिश्रमांचे, समर्पणाचे आणि उत्तम नियोजनाचे फलित आहे हे नक्की!

आपल्या पुढील संमेलनासाठी मनापासून शुभेच्छा! यासाठी आम्हाला काही योगदान देण्याची संधी दिलीत
तर आम्ही नक्की प्रयत्न करू 🙏

Mr. Salil Datar and Mrs Priyanka Datar


Mr. Mukund Datar (2nd message)

Dhananjay sir, It was really a wonderful event. Well organised and got an opportunity to meet
and connect many.
Special thanks to volunteers & those who helped Dhananjay sir.
Whole event was happened like a symphony (orchestra concert) & Dhananjay sir was a
conductor of same.
👏👏👏👏👏

Mr. Mukund Datar

📞 For Clarification / Queries:

Mr. Shriram Datar – +91 99703 91761
E-mail : treasurer@datarkulmandal.com

Mr. Dhananjay Datar – +91 98900 24404
E-mail – chairman@datarkulmandal.com