7th Datar AGM 2025
७ वी दातार कुलमंडळ वार्षिक सभा – एक प्रेरणादायी प्रवास आणि नव्या पर्वाची सुरुवात
परिचय
पुण्यात नुकतीच पार पडलेली दातार कुलमंडळाची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. ही सभा केवळ औपचारिक बैठक नव्हती, तर आपल्या समाजाच्या एकतेचे, परंपरेचे आणि प्रगतीचे सुंदर प्रतिक होती. नावनोंदणीपासून शेवटच्या धन्यवादपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एक आगळं वेगळं वातावरण जाणवत होतं — उत्साह, सलोखा आणि समाजाभिमान. वेळेचे नियोजन, व्यवस्था, भाषणांची मांडणी हे सर्व इतके सुंदर आणि सुटसुटीत होते की प्रत्येक उपस्थिताने सभेचा आनंद लुटला. आयोजन समितीचा यामागे असलेला प्रयत्न खरोखरच स्तुत्य होता.
DIMS शुभारंभ
या सभेतील सर्वात मोठा टप्पा म्हणजे Datar Information Management System (DIMS) या नव्या डिजिटल प्रकल्पाचे उद्घाटन. हा एक आधुनिक व सर्वसमावेशक उपक्रम असून, प्रत्येक दातार कुटुंबाला आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरण्याची संधी देतो. यामुळे आपण आपली परंपरा जपत, पुढील पिढ्यांसाठी एक सुसंगत माहितीभांडार निर्माण करू शकतो. IT टीमने अत्यंत सोप्या भाषेत, सहज समजेल अशा पद्धतीने हे कसे वापरायचे हे दाखवले. या उपक्रमामुळे दातार समाजातील एकोपा वृद्धिंगत होईल, आणि आपला समाज आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडला जाईल.
सदस्यांचे प्रत्यक्ष अनुभव
“माझ्या दातार कुलमंडळातील बंधू भगिनींनो, काल मी पुणे मुक्कामी आपल्या दातार कुलसंमेलनाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होतो. मी प्रथमच आपल्या ह्या सभेला उपस्थित राहिलो. आणि खरं सांगायचं झालं तर भाराऊन गेलो. अतिशय सुंदर असे सभेचे ठिकाण आणि सर्व व्यवस्था एकदम उत्तम. अध्यक्षांकडूनच स्वागत, उत्तम खेळीमेळीचे वातावरण. सभेची सुरवात वेळेवर आणि प्रत्येक मुद्यावर अध्यक्ष महोदयांचे उत्तम to the point विवेचन, स्पष्टीकरण. अतिशय सुंदर ओघवती असे त्यांचे विवेचन. अर्थात बाकी सर्वांचे म्हणजे उपाध्यक्ष,खजिनदार , IT team ह्यांचे विवेचन देखील खूप अप्रतिम. सभेची सुरवात देखील खूप छान. मी माझ्या नोकरी व्यवसायात खूप presentations पहिली, ऐकली. पण कालची सभा अपूर्व अशी झाली. आणि शेवटच्या सत्रात आपले commdr दातार सर ह्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली. सोसायटी मधील AGM कधी संपते असे वाटते. इथे त्याच्या उलट होते. असो एकंदरीत मी खूप प्रभावित झालो.”
– Vasant Datar, Pune
“नमस्कार…!
कालची दातार कुळ मंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत नियोजनबद्ध,उत्साहात आणि खेळी-मेळीत पारपडली,
त्यात मंडळाचे अध्यक्ष महोदय त्यांच्या नेहमी प्रमाणे point to point बोलणे,आणि सगळ्या सहकारी, पदाधिकारी ह्यांना सोबत घेऊन उत्साहात मार्गदर्शन करून मंडळाचे कार्य करणे, IT मधील सहकारी मेंबर्स यांनी “दातार कुल वृत्तांत एका क्लिक वर” (हे नाव मी आपले इथे दिलंय😊) गूगल वरून माहिती कशी मिळवता येईल, त्यातील सुसूत्रता,अतिशय सोप्या सुंदर प्रकारे मार्गदर्शन..
दुसऱ्या सत्रात commdr श्री हर्षद जी दातार ह्यांनी दिलेली माहिती पण ज्ञानात भर टाकणारी अशी च होती.असो तरी एकूण सभे चे नियोजन उत्तम होते.👍🏼“
– Manasi Vartak
“कालची आपली AGM फारच सुरेख आणि नेटकी झाली. A.C. हॉल मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वेळेत नावनोंदणीने सुरवात होऊन ती वेळेत संपली देखील.
ट्रस्ट साठी आवश्यक त्या सगळ्या formalities, सर्व कमिटी मेंबर्स च्या कामाचा आढावा तसेच त्यांनी नेटक्या आणि नेमक्या शब्दात दिले स्पष्टीकरण, कुलमंडळावरील नावनोंदणीची दिलेली व्यवस्थित माहिती, सर्व प्रश्नांची मिळालेली समाधानकारक उत्तरे, सर्व मुद्दे घेऊन ते योग्य ठिकाणी संपवण्याचे धनंजय सरांचे कसब, कमांडर हर्षद दातार यांची सांगितलेली युद्ध आणि त्यासंबंधीची अनोखी माहिती, त्यावरील कहर म्हणजे चहा-कॉफी पान आणि चविष्ट जेवण……..
अनेकांनी अनेक जबाबदाऱ्या घेतल्या, चर्चा-उपचर्चा होऊन शेवटी एकमताने काही निर्णय घेतले गेले. सगळेच मेंबर्स खूप actively मोकळेपणाने बोलत, सहभाग घेत होते, त्यामुळे हलक्या फुलक्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला असे मला वाटले……“
– Madhura Tapare-Agarkar
“कालची आपली AGM फारच सुरेख आणि नेटकी झाली. A.C. हॉल मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वेळेत नावनोंदणीने सुरवात होऊन ती वेळेत संपली देखील.
ट्रस्ट साठी आवश्यक त्या सगळ्या formalities, सर्व कमिटी मेंबर्स च्या कामाचा आढावा तसेच त्यांनी नेटक्या आणि नेमक्या शब्दात दिले स्पष्टीकरण, कुलमंडळावरील नावनोंदणीची दिलेली व्यवस्थित माहिती, सर्व प्रश्नांची मिळालेली समाधानकारक उत्तरे, सर्व मुद्दे घेऊन ते योग्य ठिकाणी संपवण्याचे धनंजय सरांचे कसब, कमांडर हर्षद दातार यांची सांगितलेली युद्ध आणि त्यासंबंधीची अनोखी माहिती, त्यावरील कहर म्हणजे चहा-कॉफी पान आणि चविष्ट जेवण……..
अनेकांनी अनेक जबाबदाऱ्या घेतल्या, चर्चा-उपचर्चा होऊन शेवटी एकमताने काही निर्णय घेतले गेले. सगळेच मेंबर्स खूप actively मोकळेपणाने बोलत, सहभाग घेत होते, त्यामुळे हलक्या फुलक्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला असे मला वाटले……“
– Madhura Tapare-Agarkar
“मी सुद्धा काल पहिल्यांदाच kulmandal च्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होतो. सभा उत्तम झाली.
Committee सदस्यांनी सर्व उपस्थितांना मंडळाच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती सांगितली.
श्री धनंजय दातार यांनी नविन उपक्रम हाती घ्यावेत असे सुचवले. तसेच सर्वांनी या बाबतित सूचना कराव्या यासाठी आवाहन केले.
Retired Commodore Harshad ji Datar यांनी उपस्थितांना ऑपरेशन सिंदूर बद्दल थोडक्यात माहिती सांगितली व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
मुख्य म्हणजे आपल्या दातार kulmandal मधील आणखी काही members बरोबर ओळख झाली व संवाद साधता आला.
Committee che तसेच श्री. हर्षदजी यांचे धन्यवाद!“
– Arun Ramchandra Datar, Warje, Pune
“मीटिंग अगदी व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
तात्पर्य.. एकंदर जे मला जाणवले ते असे की, खूप लोक उत्सुक आहे सहभागी व्हायला. योग्य मार्गदर्शन आणि मेळ याची आवश्यकता आहे.
तो योग्य रीतीने बसवू शकलो तर ठरवल्या प्रमाणे नवीन कार्यक्रम हाती घेता येतील आणि सुंदर रित्या पार पडतील अशी खात्री वाटते.
*यात तुमचे योगदान खूप अमूल्य आहे.* 🙏🏻 आणखी एक नमूद करण्यासारखे म्हणजे DIMS अतिशय कल्पकतेने तयार केलेली आहे. आधीच्या पिढीची नवीन पिढी बरोबरची सांगड खूप सुबक रित्या घातली आहे! 👌🏻👌🏻👏🏻“
– Omkar Datar
“
*जवळ जवळ पाऊण महिना गाजत असलेली दातार कुलमंडळाची वार्षिक सभा अतिशय सुनियोजीत पध्दतीने पार पडली. माझ्या प्रतिक्रियेला उशीर झाला कारण मी सभेनंतर परस्पर मुलीकडे रहायला गेले होते.*
*मी अशा सभेला प्रथमच हजर राहिल्यामुळे मनात खूपच उत्सुकता होती. आणि महत्वाचे म्हणजे सभेला आपले सगळे दातारच असणार होते. ह्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यापासून ती पार पडेपर्यंत प्रत्येकाने घेतलेले कष्ट सतत जाणवत होते. आपले अध्यक्ष श्री. धनंजय दातार यांचे मुद्देसूद भाषण, प्रत्येक शंकांचे त्यांनी केलेले निराकरण सगळ्यांनाच खूप भावले. स्वतःचा होल्ड ठेऊन प्रत्येकाकडून विशेषतः नविन पिढीकडून विश्वासाने जबाबदारी सोपवून काम करुन घेण्याची त्यांची पध्दत सगळ्यांनाच पसंत पडली. जेवण, चहा, काॅफीपासून सर्व व्यवस्था अतिशय उत्तम होती. आपल्या IT मधील सहकार्यांनी दातार कुलमंडळातील सर्व सदस्यांना गुगलच्या एका क्लिकवर नेऊन ठेवायची केलेली धडपड कौतुकास्पद होती. . सगळ्यात कडी केली मा. कमांडर हर्षद दातार यांनी सिंदूरवर केलेले अतिशय उत्कंठावर्धक भाषण.*
*आपले मा. अध्यक्ष आणि त्यांच्या टिमचे दातार कुलमंडळाच्या वार्षिक सभेचे आयोजन मोकळ्या वातावरणात केल्याबद्दल आभार भानावे तेवढे थोडेच आहेत. ही सभा सर्व दातार कुलबंधू भगिनींच्या चांगलीच स्मरणात राहील.*
“
– Smt. Lata Datar
निष्कर्ष
ही सभा एक बैठकीपुरती मर्यादित नव्हती. ती दातार समाजाच्या सामूहिक ध्येयाची साक्ष होती. चला, आपण सर्वांनी DIMS वर नोंदणी करून आणि नवीन उपक्रमात सहभाग घेत, या वाटचालीला बळ देऊया. शेवटी, अध्यक्षांचे काही शब्द.
From the Managing Committee
Respected Members,
The managing committee is overwhelmed with your presence, participation and response at the 7th AGM.
We express our gratitude for your support and guidance to enable us to carry out our activities.
At the ANNUAL GENERAL MEETING, an important project, DATAR INFORMATION MANAGEMENT SYSTEM, was demonstrated.
We are pleased to announce that the DIMS has been launched.
All Datars are requested to register and enter their profiles.
Please read the instructions and register.
The link is:
👉 नोंदणीसाठी येथे क्लिक करा
👉 Click here to register
Fill up yours and your family’s profiles and encourage others to do that too.
Wishing all of us a GREAT INFORMATION BASE …
Shatanu and Sanjay as the IT TEAM, are there to support and clarify.
– Dhananjay Datar, Chairman

