नोंद घेण्याजोगे
Dr Nikhil ‘s PIL of Living Will
वैद्यकीय इच्छापत्र
आपले वैद्यकीय उपचार कसे केले जावेत , आयुष्याच्या अंताला किती वैद्यकीय आधार आपल्याला देण्यात यावा , मृत्यूपश्चात अवयवदान , याचा विचार आधीच करून ठेवणे म्हणजे वैद्यकीय इच्छापत्र – Living Will तयार करणे. याविषयी आपल्याकडे मान्यता मिळाली तरीही त्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. अर्ज कसा करावा , कोणाकडे जावे याविषयी नागरिक आणि सरकारी यंत्रणा दोघेही अनभिज्ञ होते. यासाठी डॉ. निखिल दातार यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका ( Public Interest Litigation ) दाखल केली होती .
सर्वोच्च न्यायालयाने यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला दिले .
या आदेशाची अंमलबजावणी म्हणून , ही यंत्रणा राबवण्यासाठी ३८८ अधिकार्यांची नियुक्ती केली आहे, असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आणि या अधिकार्यांची नियुक्ती केली. एका जागृत नागरिकाने समाजाच्या हितासाठी सुरू केलेल्या या लढ्याला पहिलं यश मिळालं आहे.
यापूर्वी स्त्रीरोगतज्ञ आणि कायद्याचे पदवीधर असलेल्या डॉ. निखिल दातार यांनी सर्वोच्च न्यायालयात चौदा वर्ष एकहाती लढा दिल्याने देशाचा गर्भपात कायदा बदलला आहे.
यापुढे देखील Death with Dignity – सन्मानपूर्वक मरण हा हक्क भारतीय नागरिकांना मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत .
अयोध्येची ऊर्मिला
डॉ. स्मिता दातार लिखित ‘ अयोध्येची ऊर्मिला ‘ ही कादंबरी २५ डिसेंबर २०२३ या वाचक दिनाला ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केली . अल्पावधीतच या कादंबरीला अक्षरसागर पुरस्कार, एग्रोन्यूज पुरस्कार आणि साहित्यसेवा प्रज्ञामंच पुणे असे तीन पुरस्कार घोषित झाले. या कादंबरीवर जाणकार वाचकांच्या अभिप्रायांचा पाऊस पडत आहे. रामायणातल्या लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला चौदा वर्ष एकटी राहिली . तिच्यावर रामायणात चार वाक्यांपेक्षा जास्त लिहिलं
गेल नाही. अस का झालं असावं ? या प्रश्नाचा मागोवा घेत आकाराला आलेली ही कादंबरी . ऊर्मिला खरी कशी असेल ? तिच एकाकी आयुष्य तिने कस घालवल असेल ? या प्रश्नांचा लेखिकेन या कादंबरीत मागोवा घेतला आहे. रामायणातल्या संदर्भांवर आधारित ही काल्पनिक कादंबरी त्या काळावर , समाज जीवनावर प्रकाश टाकतेच पण ती वर्तमानकाळातल्या स्त्रियांच्या जीवनाशी वाचकांना जोडते. आज ही व्यावहारिक आणि सामाजिक जीवनात स्त्री ला उपेक्षेला सामोरं जाव लागत , त्याची बीज आपल्या भूतकाळात पेरली गेली होती का ? आणि यावर आजची स्त्री उर्मिलेसारखी मार्ग काढते का ? अयोध्येची ऊर्मिला या वाचनीय , महितीपूर्ण आणि तितक्याच रंजक कादंबरीत याची उत्तरं मिळत जातात .
ही कादंबरी एमेझोनवर , ग्रंथालीत आणि लेखिकेकडे उपलब्ध आहे.
गोपाळ गणेश आगरकर
Place of birth: Tembhu
Place of death: Pune
Date of birth: 14 July 1856