दातार कुलमंडल मध्ये आपले स्वागत आहे..
दातार कुलमंडळ ट्रस्ट
दातार कुलवृत्तांत १९७४ साली प्रकाशित करण्यात आला होता. त्यामध्ये जेवढ्या कुळांची आणि व्यक्तींची १९७२ सालापर्यंत माहिती मिळाली होती ती गोळा करून त्याचे प्रकाशन १९७४ साली झाले होते. त्यावेळचा संपादकांनी अतिशय कष्ट करून, अनेक गावांना भेटी देऊन , स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून आपल्या सर्वांसाठी एक उत्तम ग्रंथ निर्माण केला . आज आपण त्याचा संदर्भ वापरून पुढील वाटचाल करत आहोत .
मध्यांतराचा काळामध्ये काही कुलबंधू एकत्र आले आणि या कुलवृत्तांताची पुढील आवृत्ती काढण्याचा प्रयत्न झाला . परंतु काही कारणाने त्यात यश आले नाही..
साधारणपणे २०१६ -१७ या कालखंडात परत काही कुलबंधू एकत्र आले आणि कुलवृत्तांत नूतनीकरण करण्याबाबत चर्चा चालू झाली. हे काम फार मोठे आणि निर्धाराने करण्यासाठी काय करावे या बाबत बराच विचार विनिमय चालू झाला . आपल्या कुलामधील सभासदांना एकत्र आणण्यासाठी पहिले कुलसंमेलन २०१८ साली पुणे येथे घेण्यात आले. त्या प्रसंगी मसाला किंग डॉ धनंजय दातार दुबई येथून खास या कार्यक्रमासाठी आले आणि आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . एकूण ३८५ कुलबंधू आणि माहेरवाशिणी या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते . या संमेलनानंतर सर्वे कार्यकर्त्यांचे आपण एक न्यास स्थापन करू असे ठरले . वकिलां बरोबर चर्चा करून २०१८ साली दातार कुलमंडळ या न्यासाचे स्थापना झाली. संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणी क्र महा / १९७५/२०१८/ पुणे , दिनांक १७/१२/२०१८/पुणे आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० अन्वये F ५२३९८ / पुणे या द्वारे नोंदणी प्रमाणपत्र ९/४/२०१९ रोजी प्राप्त झाले. आपल्या न्यासाचे ५ विश्वस्त आहेत आणि कार्यकारिणीमध्ये एकूण १० सभासद आहेत . सर्व सभासद विविध विषयामध्ये तज्ञ आहेत , त्याचा संस्थेला चांगला फायदा होत आहे . संस्थेची स्वतःची नियमावली आहे आणि संस्थेचे सर्व काम नियमानुसारच चालते .
आपल्या न्यासाचे उद्दिष्ट चित्पावन कुलोत्पन्न दातार , आघारकर, आगरकर , वर्तक , सबनीस , फडणीस , दफ्तरदार , चौकर तसेच देशस्थ कुलमधील भारद्वाज आणि कपिलस गोत्री कुलकर्णी या उपनावांच्या व्यक्ती तसेच सर्व माहेरवाशिणी आदींना एकत्र आणणे , त्या द्वारे संपूर्ण समाजाची उन्नती करणे हा आहे . शिक्षण संस्था चालू करून चालवणे, गरजू मुलांना शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे , इस्पितळ दवाखाने उभारणे , चालवणे , वैद्यकीय सेवा आणि मदत करणे , सांस्कृतिक कार्यक्रम , विविध कला , खेळ , पर्यावरणा संधर्भात जनजागृती करणे , विविध समित्या स्थापन करून असे विविध उपक्रम आपणा सर्व सभासदांच्या सहभागाने घेण्याचे नियोजन आहे .
कुलमंडळाचे अजून एक महत्वाचे काम दातार कुलवृत्तांत १९७४ चे नूतनीकरण करणे हे आहे. आपण सर्वांना माहिती असेलच कि आपल्या दातार कुळामध्ये अनेक गोत्रे आणि घराणी आहेत . ही गोत्रे आणि घराणी खालील प्रमाणे आहेत.
वसिष्ठ गोत्र , ऋग्वेदी एकूण १८ घराणी | |
वसिष्ठ गोत्र हिरण्यकेशी एकूण ३९ घराणी | |
शांडिल्य गोत्र एकूण ८ घराणी | |
देशस्थ भारद्वाज आणि कपिलस एकूण ३ घराणी |
मागील कुलवृत्तांतामध्ये अंदाजे ५००० व्यक्तींचा समावेश आणि काहींची माहिती आहे. २०२० सालापर्यंत म्हणजे मागील ५० वर्षांमध्ये हा आकडा वाढून १२००० ते १५००० व्यक्ती असतील असे वाटते . आपल्याला या सर्व व्यक्तीपर्यंत पोहोचवायचे आहे आणि सर्वांची माहिती गोळा करून सर्वांना एकत्र आणावयाचे आहे . या मध्ये विद्यार्थी , उद्योग आणि सेवा देणारे , विविध पदावर नोकरी करणारे , कला खेळ विविध तज्ञ, वधु वर , अश्या अनेक सामाजिक , व्यावहारिक योजना आखून आपल्या कुलबांधवांची उन्नती होईल या साठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत . आपले या बद्दलचे विचार आमचे कडे अवश्य पाठवावेत.
आपले विश्वस्त श्री मंदार दातार आणि सर्वे कार्यकारिणी सभासद यांनी गेले अनेक महिने अखंड काम करून आपल्या सर्वांची माहिती गोळा करणे आणि त्यातून शोध घेणे या साठी अविरत प्रयत्न करून ही वेबसाईट तयार केली आहे. सध्या १९७४ ची माहिती भरण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. काही घराण्यांची माहितीचा अंतर्भाव झाला आहे आणि उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल . आपण सर्वांना विनंती आहे कि आपले घराणे शोधून आपल्या पूर्वजां पुढील पिढ्यांची माहिती आमच्या कडे पाठवावी . त्यामध्ये सर्व पुरुष, महिला , मुले मुली माहेरवाशिणी यांची माहिती भरावयाची आहे. आपले फोन नं , जन्मतारीख इ माहिती गोळा करत आहोत पण ते सर्वांना दिसणार नाहीत. जर कोणाला हे माहिती हवी असेल तर आम्हास संपर्क साधावा . आपली माहिती कशी भरावयाची याचे मार्गदर्शन केले जाईल . हि माहिती भरणे आणि पाहणे ,आपण सर्व कुलबंधूंसाठी विनामूल्य असेल . सभासदत्व घेणाऱ्यांसाठी काही योजना बनवल्या जात आहेत .
वरील सर्वे कामांसाठी संस्थेला आर्थिक पाठबळ असणे फार गरजेचे आहे. आम्ही सर्व विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्य सर्वांना मनःपूर्वक विनंती करत आहोत की आपण संस्थेचे साधारण किंवा आजीवन सभासदत्व घ्यावे आणि सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा .काहींना काही विशिष्ट उद्दिष्ट साठी अथवा पुण्यस्मरण देणगी द्यावयाची असेल तरी आम्हास जरूर संपर्क साधावा.
आपल्या कुलमंडळाचे बँक खाते तपशील पुढीलप्रमाणे:
Bank : | Janata Sahakari Bank Ltd |
Branch : | Sahakarnagar Branch Pune |
Type of Account : | Saving |
Account no | 036220100028409 |
IFSC Code | JSBP 0000036 |
अजून एक आवाहन कृपया आपल्या परिचयामधील किंवा नात्यामधील दातार कुल बंधू आणि भगिनींचे संदर्भ , त्यांचे दूरध्वनी क्रमांक , इ मेल , राहण्याचे ठिकाण या संबंधी माहिती आम्हास पाठवावी . आपण सर्वे एकत्र येऊन आपल्या कुळाची उन्नती आणि पुढील पिढ्यांसाठी भक्कम सांस्कृतिक आणि आर्थिक पाया उभारू या.
कळावे
आपला नम्र
राजीव श्रीपाद आघारकर
सचिव, दातार कुलमंडळ,
पुणे.