दातार आडनाव आले कोठून?

आडनाव अर्थात उपनाम वापरण्याची प्रथा हि प्रामुख्याने पेशवाईत जास्त प्रचलित झाली आडनाव हे मुख्यत: गावावरून किंवा विशिष्ट कामावरून किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावा नुसार पडलेले दिसते दातार हे आडनाव, गुणवैशिष्ट्य दर्शविणारे आहे दातार हा शब्द संस्कृत ‘दातृ’ या नामाचे प्र्थ्मेचे अनेकवचन आहे या आडनावाची बहुतांश घराणी हि चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राम्हण शाखेची आहेत चित्पावन कोकणस्थ घराणी हि प्रामुख्याने वासिष्ठ आणि शान्दिल्या या दोन गोत्रांतर्गत येतात तर देशस्थ ब्रम्हान घराणी हि भारद्वाज आणि कपिलस गोत्राची आहेत

दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवितो त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी या नावाची उपपत्ती लावता येते सध्याच्या आंध्र प्रदेशातील गुत्ती या शहराजवळ दातारी नावाचे खेडेगाव आहे कपिलसगोत्रातील दातार घराणे या गावास आपले मूळ गाव समजते त्या गावाच्या नावावरून त्यांचे नाव दातारीकर आणि पुढे दातार झाले अशी माहिती मिळते

चित्पावन दातार घराणी हि वासिष्ठ गोत्रा मध्ये ऋग्वेदी आश्वलायन, आणि यजुर्वेदी हिरण्यकेशी शाखेची आहेत शांडिल्य गोत्रातील घराणी हि ऋग्वेदी आहेत चित्पावनांच्या मूळ साठ आडनावांपैकी, दातार हे आडनाव नाही अशी माहिती आपटे कुलवृत्तांताच्या प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेत मिळते. याचा अर्थ दातार हे आडनाव कोणा व्यक्तीच्या गुणामुळे प्रचलित झाले, आणि त्याच्या पुत्र पौत्रानी ते तसेच पुढे चालविले असे म्हणता येईल. आपटे कुलवृत्तान्तातील या माहितीच्या आधारे वसिष्ठ गोत्रातील ऋग्वेदी दातारांचे मूळ आडनाव गोवंडे असावे. वसिष्ठ यजुर्वेदी दातारांचे मूळ आडनाव भामे, तर शान्दिल्या गोत्रातील दातारांचे मूळ आडनाव दामले असावे. अर्थात हा एक अंदाज असून यावर तत्कालीन लोकांनी आक्षेप घेतले होते.

तथापि, दातार घराण्यातील पुढील काळात झालेली आडनावांची विभागणी सर्व मान्य आहे. हि विभागणी पुढील प्रमाणे

दातार या आडनावाचा सर्वात प्राचीन म्हणता येईल असा उल्लेख मुरूडच्या बखरीत आढळतो. दक्षिण कोकण आणि कर्नाटकात ई.स. ८०० ते १२०० या काळात राष्ट्रकुट राजांचे मांडलिक शिलाहार राजे राज्य करित होते. त्यांच्या काळात एका सिद्ध पुरुषाने मुरुड गाव वसविला. त्यानेच मुरुड येथे काही ब्राम्हण कुटुंबांना वस्ती करून राहण्यास सांगितले. दुर्गादेवीची स्थापना करून तीची पूजा अर्चा यांची व्यवस्था केली. सिद्ध पुरुषाने ज्या कुटुंबांना मुरुड गावी वसविले त्यात दातार, कर्वे, वैशंपायन ई. घराणी होती. दातार आडनावाचा हा सर्वात जुना उल्लेख म्हणावा लागेल. मुरुड येथे आजही या सिद्ध पुरुषाची समाधी पाहता येते. तसेच दुर्गादेवीच्या पूजेचा मान परंपरेने दातार कुटुंब सांभाळते आहे. वसिष्ठा गोत्रातील आश्वलायन शाखेची बहुतेक घराण्यांची कुलदेवता हि मुरूडची दुर्गादेवी आहे.

दातृत्व गुणामुळे दातार नामाभिदान लाभलेले दातार कुटुंबीय आजही आपल्या पूर्वजांची गुण वैशिष्ट्ये बाळगून आहेत. विविध क्षेत्रात आणि विविध प्रांतात दातार लोक वसलेले आढळतात. परदेशात देखील अनेक कुटुंबे स्थायिक झालेली आहेत. आपल्या पूर्वजांचे स्मरण व्हावे आणि नव्या पिढीने त्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करावे यासाठी या इतिहासाचे स्मरण आवश्यक ठरते.

मंदार विजय दातार
संदर्भ: दातार कुलवृत्तांत प्रथम आवृत्ती
Adspace 1
Adspace 1